Coronavirus : अभिनेत्री सुष्मिताला मिळालं ‘कोरोना’ व्हायरसवर औषध ! फोटो शेअर करत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन :चीनमधून सुरू झालेली महामारी कोरोना व्हायरस देशासाठी नव्हे तर जगासाठी डोकेदुखी बनली आहे. यामुळं 24 मार्च 2020 पासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला आहे. अशातच आता बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन हिनं कोरोना व्हायरसवर एक नवीन औषध सांगितलं आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

सध्या लॉकडाऊनमुळं सारेच सेलिब्रिटी घरातच आहेत. असं असलं तरी सोशल मीडियावरून ते चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. सुष्मिता सेननं सोशलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं कॉविड 19 चं औषध सांगतलं आहे. सुष्मितानं एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मितानं औषधाच्या लहान बाटलीचा फोटो शेअर केला आहे. यावर लिहिलं आहे, स्टे होम. सुष्मितानं सांगितलं आहे की, घरात राहणं हेच कोरोनावर औषध आहे. त्यामुळं सर्वांनी घरात रहा असा सल्लाही तिनं दिला आहे.

पोस्टमध्ये सुष्मिता म्हणते, “घरातच रहा. डॉक्टरांकडून तपासणी केल्याशिवाय स्वत:हून कोणतंही औषध घेऊ नका. डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं घ्या.”

वीना लॅबोरेटरीच्या स्टडीमधील अनेक गोष्टी सुष्मितानं समोर ठेवल्या आहेत.पोस्टमध्ये पुढे बोलताना सुष्मिता म्हणाली, “ज्या लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यांच्या शरीरात आयबप्रोफेनचं(Ibuprofen) प्रमाण आढळून आलं आहे. Ibuprofen हे एक औषध आहे जे वेदना कमी करण्यासाचं काम करतं. जर वेदना होत असतील तर साधारण पॅरसिटामॉल (Paracetamol)चं सेवन करणं ठिक आहे. पूर्णपणे माझ्यावरही विश्वास ठेवायला हवा असं काही नाही. काहीही करण्याआधी डॉक्टरांनाचा सल्ला नक्की घ्या.”

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 724 झाली आहे. यात 640 अॅक्टीव केसेस आहेत. यातील 67 लोक नीट झाले आहेत. तर 17 लोकांनी आपला जीव गमावला आहे.