Coronavirus Lockdown : बिल गेट्स यांची राष्ट्रांना अर्थव्यवस्था सुधारणेसाठी ‘पंचसूत्री’

पोलिसनामा ऑनलाईन –  संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे.  यातच अनेक देशांच्या अर्थव्यवस्था देखील ढासळू लागल्या आहेत .  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या बिल गेट्स यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी मोलाचे सल्ले दिले आहेत.  नेमकं  काय म्हणाले बिल गेट्स जाणून घेऊयात,  कोरोनावर मात करून अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करायची असेल तर प्रामुख्याने पाच गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे .

कोरोनावर उपचार घेणे ,लवकरात लवकर लस शोधणे, तपासणी द्वारे रुग्णापर्यंत  लवकरात लवकर थेट पोहचणे तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग   आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करणे या पाच   गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे . यामुळे नक्कीच संपूर्ण जग कोरोनासारख्या राक्षसाचा तावडीतून सुटू शकेल .

बिल गेट्स असे  सुद्धा म्हनाले कि,  कोरोनाने जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे त्या मुळे  मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढली आहे अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत त्यामुळे कोरोनावर लवकरात लवकर लस शोधली पाहिजे त्या शिवाय जग हे पूर्व पथावर येणार नाही  . तसेच कोरोनावर लवकरात लवकर लस शोधल्यावर ती लस जगातील ७०० कोटी जनतेला देण्यात यावी. लवकरात लवकर यावर लस शोधण्यात यावी आणि लस शोधण्यात यश आले कि याची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी कारण त्या मुळेच सातशे कोटी लोकांना या लसीचा  फायदा करून  देता येईल. लसीची निर्मिती हि मोठ्या प्रमाणावर करण्यात येणे गरजेचे आहे कारण लस जर कमी पडली तर ती मिळवण्यासाठी आपापसात स्पर्धा लागून मोठा गोंधळ उडू शकतो. असे मत बिल गेट्स यांनी व्यक्त केले.  काही दिवसांपूर्वीच  बिलगेट्स यांनी पत्राद्वारे मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. कोरोना काळात मोदींनी योग्य निर्णय घेतले असे म्हणत बिल गेट्स यांनी मोदींच्या प्रत्येक निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले.