COVID-19 IN India : आशियामध्ये पहिल्या आणि जगात 9 व्या स्थानवर पोहचला भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत कोरोनाच्या प्रकरणामध्ये आशियामध्ये पहिल्या स्थानावर आणि जगामध्ये 9 स्थानावर पोहचला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर तीन दिवसामध्ये जर्मनी, फ्रान्सच्या पुढे जाऊन भारत 7 स्थानावर पोहचू शकतो. कोरोना विषाणूमुळे जागतिक स्तरावर भारताने आणखी एक उडी घेतली आहे. जगातील सगळ्या प्रभावित देशांमध्ये भारत नवव्या आणि आशिया पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तीन दिवसापुर्वी इरानला मागे टाकून भारत 10 व्या स्थानावर पोहचला होता.

वर्ल्डोमीटर वेबसाइट आणि जॉन हॉपकिंस युनिवर्सिटीनुसार, गुरुवारी रात्री भारतात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 1,63,120 झाली होती. या आधी सगळ्यात जास्त प्रभिवात देशांमध्ये नवव्या स्थानावर तुर्की होता. आत्तापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,59,797 झाली आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या अशीच राहिली तर तीन दिवसात जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकून भारत जगात सातवा सगळ्यात प्रभावित देश बनेल.

गुरुवारी देशात कोरोना व्हायरसला 120 दिवस पुर्ण झाले आहे. 16 मे ला भारत चीन आणि पेरूपेक्षा पुढे जाऊन 11 व्या स्थानावर आला होता. याच्या 8 दिवसानंतर आणखी पुढे जाऊन तो 10 स्थानावर पोहचला होता. सध्या अमेरिका, ब्राझील, रुस, स्पेन, यूके, इटली, फ्रान्स आणि जर्मनी जगातील सगळ्यात प्रभावित देशांच्या सूचीमध्ये भारताच्या  पुढे आहे.