Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 73.30 लाख, 24 तासात आढळले 63371 नवे पॉझिटिव्ह तर 895 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या 73 लाख 70 हजार 469 झाली आहे. मागील 24 तासात येथे 63 हजार 371 लोक कोरोना संक्रमित आढळले. 68 हजार 202 लोक रिकव्हर झाले आणि 895 रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 12 हजार 161 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाबत म्हणजे आतापर्यंत 64 लाख 53 हजार 780 लोक या व्हायरसच्या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या 8 लाख 4 हजार 528 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

मागील 15 दिवसांच्या आकड्यांवर नजर टाकली तर या दरम्यान सुमारे 1.67 कोटीपेक्षा जास्त लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. यामध्ये 6.32% म्हणजे 10.58 लाख लोक संक्रमित आढळले. चांगली बाब म्हणजे या 15 दिवसात नव्या केसपैकी 1.26 लाखापेक्षा जास्त म्हणजे सुमारे 11.85 लाख लोक बरे झाले. मागील तीन आठवड्यात नव्या केसमध्ये सुद्धा सुमारे 3% घट आली आहे. 17 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान हा दर 8.82% होता, जो 8 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान कमी होऊन 6.05% झाला. देशासाठी हा चांगला संकेत आहे.

महाराष्ट्रात सापडले 10 हजार 226 नवे रूग्ण
महाराष्ट्रात गुरूवारी 10 हजार 226 नवे रूग्ण सापडले, 13 हजार 714 लोक रिकव्हर झाले आणि 337 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 15 लाख 64 हजार 615 लोक संक्रमित आढळले आहेत. यामध्ये 1 लाख 92 हजार 459 रूग्णांवर उपचार सुरू आहे, तर 13 लाख 30 हजार 483 लोक बरे झाले आहेत. संसर्गाने 41 हजार 196 लोकांचा जीव घेतला आहे.

जगात आतापर्यंत किती केस ?
जगात प्रथमच 24 तासात विक्रमी 3.97 लाख कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. यापूर्वी 14 ऑक्टोबरला सर्वात जास्त 3.82 लाख केस आल्या होत्या. या धोकादायक आजाराने कालच्या दिवसात 6,099 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित देशांत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. जगाता आतापर्यंत 3 कोटी 91 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 11 लाख 2 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 93 लाख रूग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगात 86 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.