Coronavirus : दीपिका आणि रणवीरनं दिला मदतीचा हात, PM Cares Fund मध्ये दिलं ‘डोनेशन’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या युद्धात आपला सपोर्ट दिला आहे. दीपवीरनं पीएम केअर्सला डोनेशन दिलं आहे. किती रक्कम डोनेट केली हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

रवणीर सिंगनं आणि दीपिकानं त्यांचं एक स्टेटमेंट सोशलवर शेअर केलं आहे. रणवीरनं लिहिलं की, “सध्याच्या कठिण काळात छोटासा प्रयत्नही खूप महत्तवाचा असतो. आपण सर्वजण पीएम केअर्स फंडात विनम्रतेनं योगदान देण्याचा संकल्प करूया. जय हिंद. दीपिका आणि रणवीर.”

यापूर्वीही बॉलिवूड पासून तर टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी आपापल्या पद्धतीनं कोटींची मदत केली आहे. काहींनी आपल्या डोनेशनच्या रकमेचा खुलासा केला आहे तर काहींनी मात्र ही माहिती गुप्त ठेवली आहे. बिग बी अमिताभ बच्चन, सोनाक्षी, सिन्हा, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक स्टार्स आहेत ज्यांनी डोनेशनचा खुलासा केलेला नाही. यात आता दीपिका आणि रणवीर यांच्याही नावाचा समावेश झाला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणवीर आणि दीपिका दोघंही 83 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे. सिनेमातही दीपिका रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. रणवीर या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता. परंत कोरनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like