Coronavirus : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE)नं मागितली ‘बिग बीं’कडे आर्थिक मदत ! अद्याप ‘NO Response’ !

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हारसच्या प्रकोपामुळं सध्या देशात लॉकडाऊन आहे. घरातच बसून असल्यानं आणि काम नसल्यानं काही वर्गांचे हाल सुरू आहेत. रोजगारानं काम करणाऱ्या लोकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. अशात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत रोजगारावर काम करणाऱ्या लोकांच्या बाजून उभं राहून त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शुटींग थांबल्यानं त्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, श्रमिकांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांची मदत करण्यासाठी FWICEनं बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे आर्थिक मदत मागितली आहे. FWICEचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी खुलासा केला आहे की, पीएम मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी बिग बींना मेल केला होता.

तिवारींनी सांगितलं की, या कठिण काळात त्यांनी बिग बींकडे मदत मागितली आहे. मेल पाठवत त्यांनी सर्व स्थिती सांगितली आहे. परंतु सोशलवर सतत सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडून मात्र अद्याप काहीही उत्तर आलेलं नाही. त्यांना आशा आहे की, बिग बी त्यांना मदत करतील.

साऊथ सिनेमातील अभिनेत्यांबद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत, पवन कल्याण, महेश बाबू, चिरंजीवी, राम चरण, प्रभास, अल्लू अर्जुन अशा अनेकांनी कोट्याधी रुपये दान करत लोकांची मदत केली आहे. बॉलिवूडमध्ये हे प्रमाण काहीसं कमी दिसत आहे.