Coronavirus : जगात ‘कोरोना’चं थैमान ! 1 कोटींपेक्षा अधिक बाधित रूग्ण तर 5 लाखाहून अधिक जणांचा बळी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून जगात एक कोटींपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगात महामारीची दुसरी लाट आल्याचे सांगितले होते. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात एक कोटी 82 हजार 618 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत 5 लाख एक हजार 309 जणांचा करोना महामारीने बळी घेतला आहे.

उन्हाळ्यामध्ये करोनाचा ससर्ग कमी होईल असा अंदाज लावला जात होता. मात्र, हा अंदाच चुकीचा ठरला आहे. मे ते जून या महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी एक लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 54 लाख 8 हजार 523 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण 50 टक्केंपेक्षा जास्त आहे. सध्या 41 लाख 22 हजार 786 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

अमेरिकेत जवळपास 26 लाख जणांना संसर्ग झाला आहे. तर एक लाख 28 हजार जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील, रशिया, भारत आणि यूकेला सर्वात जास्त फटका बसला आहे. ब्राझीलमध्ये 13 लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे तर 57 हजार जणांचा बळी गेला आहे. रशियात सहा लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे. तर भारतामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे.