Coronavirus Impact : TV मालिका ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’चे एपिसोड संपले ! एकता कपूरनं घेतला ‘हा’ निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसमुळं 19 मार्च 2020 पासून टीव्ही मालिकांची शुटींगही बंद झाली आहे. मंगळवारी (दि 24 मार्च 2020) पीएम मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 21 दिवसांसाठी असणार आहे. अशात आता टीव्ही शोचे जे मेकर्स आहेत त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. शोचे बॅपअप एपिसोडदेखील संपण्याच्या मार्गावर आहेत असं दिसतंय. हे पाहून एकता कपूरनंही मोठी घोषणा केली आहे.

टीव्हीवर पुन्हा एकदा दिसणार राम-साक्षीची केमिस्ट्री

एकता कपूरनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. एकतानं सांगितलं की, शुटींग थांबवण्यात आल्यानं झी टीव्हीचे शो कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्य या मालिकांचे बॅकअप एपिसोड संपले आहेत. त्यामुळं आता साक्षी तंवर आणि राम कपूर यांचा हिट शो करले तू भी मोहब्बत पुन्हा एकदा टीव्हीवर कमॅक करणार आहे. एकतानं लिहलं की, “हा वाईट काळ सुरू आहे परंतु आपण सगळे मिळून लवकरच यातून बाहेर पडू. आम्ही कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्यचे आणखे एपिसोड बनवू शकत नाहीत.”

पुढे एकता म्हणते, “झी टीव्हीवर आम्ही आपले फॅमिली शो एक्सटेंड केले आहेत. त्यामुळे रात्री 9 ते 10 वाजता करण प्रीता आणि अभी प्रज्ञा यांना पाहण्याऐवजी करण आणि टीप्सी ला पाहणार आहात. आम्ही प्रेक्षकांच्या मदतीसाठी काहीच नाही करू शकत. परंतु या शोच्या मदतीनं प्रेक्षकांचा तणाव नक्कीच कमी करू शकते. त्यामुळं आमच्या लायब्ररीतून तुमच्यासाठी. तुमचे फेवरेट कपल साक्षी-राम आज रात्री 9 ते 10 वाजता पुन्हा टीव्हीवर परत आणत आहोत. एन्जॉय करा आणि सेफ रहा.

याशिवाय एकतानं तिचा हिट वेब शो बारिश देखील टीव्हीवर टेलीकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजता ही क्युट लव्ह स्टोरी झी टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे. कहने को हमसफर है हा शो 10.30 वाजता टेलीकास्ट होणार आहे.