बारामतीत कोरोनाचा पुन्हा फैलाव ! उपमुख्यमंत्री घेणार कठोर निर्णय

ADV

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातल्यानंतर लॉकडाऊनमध्ये बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवाडानंतर  पॅटर्न राबवला. केंद्रीय पथकाने देखील या बारामती पॅटर्नचे कौतुक केले होते. याला काही प्रमाणात यश देखील आले. परंतु लॉकडाऊन शिथिल होताच बारामतीत कोरोनाचा धोका वाढला असून कोरोना संसर्ग आता पुन्हा वेगाने वाढत  आहे.

बारामतीत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 100ा वर गेली असून आतापर्यंत नऊ जणांचा  मृत्यू झाला आहे. बारामतीत काल 59 रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यामधील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. आता प्रशासन ही साखळी तोडण्यासाठी काय प्रयत्न करणार हा खरा प्रश्न आहे.  बारामती पॅटर्ननुसार कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. सर्व अत्यावश्यक वस्तू मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वयंसेवक मार्फत घरपोच मिळत होत्या. कोणालाही बाहेरगावी जाता किंवा येता नव्हते. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यात प्रशासनास यश आले होते.