Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8,010 नवीन रुग्ण तर 7,391 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्ण (Coronavirus in Maharashtra) वाढीचा दर कमी (Patient growth) झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 7,391 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 8,010 नवीन रुग्णांची नोंद (Coronavirus in Maharashtra) करण्यात आली आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 1 लाख 07 हजार 205 इतकी झाली आहे. याच दरम्यान राज्यात 170 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 61 लाख 89 हजार 257 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 59 लाख 52 हजार 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.17 टक्के इतके झाले आहे. कोरोनामुळे आजपर्यंत 1 लाख 26 हजार 560 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.04 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 05 लाख 81 हजार 266 लोक होम क्वारंटाईनमध्ये Home quarantine आहेत. तर 4 हजार 471 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 334 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 212 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.
– 225 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 482916.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3033.
– एकूण मृत्यू – 8674.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 471209.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 7696.

पिंपरी चिंचवडमधील (PCMC) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 228 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 241 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात 01 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 261515.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 1121.
– एकूण मृत्यू – 4315.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 256097.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4797.

हे देखील वाचा

Art Director Rajesh Sapte Suicide Case | राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी राकेश मौर्याला अटक, वाकड पोलिसांची कारवाई

Pune Crime | पुण्यात बँक मॅनेजरच्या मदतीने घातला बँकेलाच गंडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Coronavirus in Maharashtra | 8,010 new corona patients in the last 24 hours in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update