Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8,535 नवीन रुग्ण, 6,013 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 535 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Corona New Cases) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 6 हजार 013 इतके रुग्ण बरे (patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 156 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजच्या 156 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 12 हजार 479 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के एवढा झाला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 1 लाख 16 हजार 165 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 40 लाख 550 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 57 हजार 799 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 287 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 287 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 481834.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3085.
– एकूण मृत्यू – 8652.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 470097.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6074.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 214 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 250 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 260665.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1319.
– एकूण मृत्यू – 4306.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 255040.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4910.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 8,535 new corona patients in the state in the last 24 hours

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य