Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात शून्य ‘कोरोना’ मृत्यूची नोंद, मार्च महिन्यातील तिसरी वेळ, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | did not record a single covid 19 fatality in state today
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचं (Coronavirus in Maharashtra) संकट दूर झाल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागनं आज (बुधवार) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनानं (Coronavirus in Maharashtra) एकही मृत्यू झाला नाही. हा राज्याला मोठा दिलासा आहे. ही महिन्याभरातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2 मार्च आणि 7 मार्च रोजी कोरोनानं एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. राज्यात गेल्या 24 तासात 359 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

 

 

राज्यात आज 559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 19 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 69 हजार 857 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 3 हजार 009 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | did not record a single covid 19 fatality in state today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Raj Thackeray In Pune | … म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी – राज ठाकरे (व्हिडिओ)

 

Yamini Malhotra Nude Photoshoot | ‘ही’ सौंदर्यवती आहे टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री, तिनं कित्येकदा केलं आहे न्यूड फोटोशूट

 

New Cricket Rules | ‘कॅच पकडला अन्…’; क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल! वाचा सविस्तर

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती