Coronavirus in Pune | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 346 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Pune) संख्या पाचशेच्या आत आली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 346 नवीन रुग्णांची नोंद (Coronavirus in Pune) झाली आहे. तर 287 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 84 हजार 702 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 126 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8709 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2867 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9697 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 28 लाख 08 हजार 884 तपासणी करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2867 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 227 रुग्ण गंभीर आहेत,
तर 387 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.44 टक्के
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 73 हजार 336 रुग्णांपैकी 10 लाख 45 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 339 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.44 टक्के आहे.

Web Title :- Coronavirus in Pune | 346 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला