धक्कादायक ! 2 वर्षे तरी कोरोनाला रोखणे शक्य नाही – तज्ज्ञांचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात सध्या कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे 34 लाखांपेक्षा जास्त रुग्ण झाले असून 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस कधी संपुष्टात येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र किमान 2 वर्ष तरी कोरोना व्हायरसला रोखणे शक्य नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

अमेरिकेच्या मिनेसॅटा युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोग रिसर्च केंद्राच्या शास्त्रज्ञांनी 300 वर्षांच्या इतिहासातील फ्लूसंबंधी महासाथींचा अभ्यास केला. त्यानुसर पहिल्या 6 महिन्यांनंतर महासाथीचा दुसरा टप्पा येतो आणि त्यावेळी आजार अधिकच घातक ठरतो. जवळपास 2 वर्षांपर्यंत आणखी टप्पे येतात, मात्रा, त्यांचा प्रभाव फारसा नसतो. महासाथीचा कालावधी दीड ते दोन वर्षांपर्यंत असतो. दरम्यार, याआधी भारतात कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटीची थिएरी दिली आहे.

भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संक्रमित होऊन व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करावी लागेल. आता भारताबाहेरील शास्त्रज्ञांनी हर्ड इन्युनिटीबाबत नव्याने रिसर्च केला आहे. त्यानुसार जोपर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्या संक्रमित होत नाही, तोपर्यंत कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवता येणार नाही, सध्या फक्त 34 लाख प्रकरणे आहेत आणि हा लोकसंख्येचा खूप कमी हिस्सा आहे. त्यामुळे या कोरोनाव्हायरसचा प्रसार नैसर्गिकरित्या थांबण्यासाठी प्रक्रियेला 2 वर्षांचा वेळ तर लागेल असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.