Coronavirus : ‘किंग’ खान ‘कोरोना’ डोनेशनमुळं ‘ट्रोल’, चाहत्यांनी दिलं SRK च्या ‘दिला असं’चा पुरावा

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या अनेक बॉलिवूड स्टार्स कोरोनाविरूद्ध लढाई लढण्यासाठी शक्यत ती मदत करत पैसे डोनेट करत आहेत. परंतु ज्या सेलेब्सनं कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही असे कलाकार मात्र युजर्सच्या निशाण्यावर येताना दिसत आहेत. यात सर्वात वर कोणी असेल तर ते आहेत बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग साहरुख खान. अक्षय कुमारनं 25 कोटी डोनेट केले आहेत. तर सलमान खाननंही 25000 डेली वेजेसवरील बॅकस्टेज कामगारांच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी घेतली आहे.

सोशल मीडिया ट्रोलिंग या लेवलवर गेली की, बिग बींना कविता लिहित हे सांगावं लागलं की, ज्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल माहिती झालं पंरतु ज्यांनी नाही सांगितलं त्याच्याबद्दल माहिती होत नाही. त्यांनी सांगितलं की, दुसऱ्या प्रकारच्या कॅटेगरीत रहायला त्यांना जास्त आवडेल. यानंतर शाहरुख खान मात्र सतत ट्रोल होताना दिसत आहे.

परंतु शाहरुखचे अनेक चाहते त्याची बाजू घेताना दिसले. #StopNegativityAgainstSRK असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करताना दिसला. अनेकांनी त्याच्या पूर्वीच्या डोनेशन्सचे स्क्रीन शॉट्स टाकून ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. सध्या अनेक ट्विट्स सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यात काही ट्रोलर्स आहेत तर काही चाहते आहेत जे शाहरुख खानची बाजू घेताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like