COVID-19 : लातूरमध्ये ‘कोरोना’चं थैमान सुरूच, 24 तासात तिघांचा मृत्यू, आतापर्यंत 32 जणांचा बळी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणा देखील वाढू लागले आहे. एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या 3२ झाली आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंडे यांनी दिली आहे .

कोरोना विषाणूच्या टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यापासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. साडे सहाशेच्या घरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेलीय. त्यात काही दिवसापासून रुग्णाची संख्या वाढत आहे. दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी ५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते तर, एकाच दिवशी इतक्या अधिक संख्येने रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यात शुक्रवारी तर एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला. ही तिघेही वृद्ध होते.

यात येथील एलआयसी कॉलनीतील ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, या व्यक्तीला दम्याचा ञास होता. मागील ५ दिवसापासून त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान सस्थेत उपचार सुरु होते. दाखल झाल्यापासून ते व्हेंटीलेटरवरच होते. येथील मिस्कीनपुरा भागात राहणारया ६० वर्षीय व्यक्तीचा चोवीस तासाच्या आत मृत्यू झाला.

या व्यक्तीला रक्तदाबाचा त्रास होता. तर निलंगा येथील ६५ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. या व्यक्तीला हदयविकाराचा आजार होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत त्यांचा मृत्यू झाला आहे, असेही डॉ. रामराव मुंडे यांनी सांगितले आहे.