Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची ‘झुंबड’ !

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांचे मात्र मोठे हाल झाले आहेत. तर लॉकडाऊनमुळे अनेक भागांमध्ये धान्यही पोहोचले नाही. कुन्हाडी पोलिस स्टेशन परिसरातील नांता भागात शनिवारी दुपारी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एका मिनी ट्रकवर दरोडा टाकूल अन्नधान्य लुटले आहे. लोकांनी या ट्रकमधील धान्य आणि पीठाची पोती पळवून नेली. ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोक या मीनी ट्रकच्या मागे पीठीची पोती आणि धान्य लुटण्यासाठी पळत असून मिनी ट्राकवर बजरंगपती मील असे लिहिले आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप या मिनी ट्रक चालकाने गुन्हा दाखल केला की नाही याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. लॉकडाऊन असताना एवढी लोक रस्त्यावर आले कुठून पोलिसांचे लक्ष नव्हते का? असे अनेक प्रश्न युझर्सनी उपस्थित केले आहेत. आधीच जीवनावश्यक वस्तुंचा अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमुळे तुटवडा आहे आणि त्यात अशा घटनांमुळे मोठे नुकसान होत आहे. अशा पद्धतीने लूट करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी युझर्सनी केली आहे.