धक्कादायक ! कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाकडून दगडफेक

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाने कुटूंबियावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कुटुंबाला मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडूनच तेथून पळ काढावा लागला. अखेर प्रशासनाने मध्यस्थी करत दुसर्‍या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. जम्मूमधील दोडा जिल्ह्याचे रहिवासी असणार्‍या 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आम्ही महसूल अधिकारी आणि वैद्यकीय पथकासोबत अंत्यसंस्कार करत होतो. अंत्यसंस्कार सुरु असतानाच तेथील काही स्थानिक लोक आले आणि अंत्यसंस्कार रोखण्यास सुरुवात केली, अशी माहिती मृत व्यक्तीच्या मुलाने दिली आहे. अंत्यसंस्काराला मृत व्यक्तीचे फक्त जवळचे नातेवाईक पत्नी आणि दोन मुले उपस्थित होते. जमावाने हल्ला करत दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने जीव वाचवण्यासाठी सर्वांना मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत सोडून रुग्णवाहिकेतून पळ काढावा लागला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आपल्या घऱी नेण्यासाठी आम्ही सरकारकडून परवानगी घेतली होती.

सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं आम्हाला सांगण्यात आले होते. अंत्यसंस्कारात कोणतीही बाधा येणार नाही असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित असणार्‍या सुरक्षा अधिकार्‍यांना कोणतीही मदत न केल्याचा आरोप मुलाने केला आहे. रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयाच्या इतर कर्मचार्‍यांनी आम्हाला फार मदत केली. मृतदेह घेऊन पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी मदत केली. मागील अनुभव लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारने योग्य तयारी केली पाहिजे, असे मृत व्यक्तीच्या मुलाने म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like