माणुसकी ! पोलिस अधिकार्‍यानं हात नसलेल्या माकडाला भरवली केळी

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाचा हैदोस सुरु असून  मेडिकल यंत्रणा, डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र काम करत आहे. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांना ते आपले देवदूत वाटत आहेत. जिथे माणसांनाच दोनवेळच्या खाण्याचा प्रश्न आहे अशा परिस्थित प्राण्यांना खायला कुठून मिळणार. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हात नसलेल्या माकडाला खाकी वर्दीतील हा देवदूत स्वत:च्या हाताने केळ भरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे गरीब लोक आणि प्राण्यांची खाण्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशातच एका पोलिस कर्मचार्‍याने भुकेलेल्या माकडाला केळी खायला दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटर यूजर खुशबू सोनीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे  आतापर्यंत 28 हजार  पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला  आहे. इतकेच नाही तर 2 हजाराहून अधिक रिट्वीट करण्यात आले आहेत. तसेच अनेक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.