Coronavirus : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाच्या हैदोसामुळे अर्थव्यवस्था ढेपाळली आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देउन मुख्यमंत्री सहायता निधीतही रक्कम जमा करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीच्या लढ्यात राज्य सरकार नागरिकांना धीर देत आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत.

कोरोना जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक राज्य आणि केंद्र सरकारला आर्थिक मदत करत आहेत. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत. एलआयसी गोल्डन जुबली फाऊंडेशनने गुरुवारी (16 एप्रिल) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत केली आणि त्यामुळे निधीमधील जमा रक्कम 247 कोटींवर पोहोचली.

मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. जनतेकडून मदतीच्या धनादेशासोबतच वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. अशा नानाविध स्वरूपातून मदत मिळत असल्यामुहे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.