…तर मग डोनाल्ड ट्र्म्प आणि माझ्यात काय फरक ? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे डोळ्यांसमोर माझी माणसे तळमळताना पाहू शकत नाही,
मी ट्रम्प नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचे समर्थन केले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून त्याचा प्रोमो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे.
Unlock Interview..
मी म्हणजे ट्रंप नाही…
मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत..
"सामना " pic.twitter.com/DiPdNjfkZK— Sanjay Raut (@rautsanjay61) July 22, 2020
प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटे अशा अनेकांवर प्रश्न विचारलेली आहेत. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? मंत्रालयात कमी गेल्याचा होणार आरोप याबंधीही विचारले आहे. उद्धव ठाकरेंनी प्रश्नांना उत्तर देताना, कोरोनासोबत राहायला सगळ्यांनी शिकले पाहिजे.
शहाणे व्हायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण तरी झाले पाहिजे असे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिले सहा महिने आव्हानेघेऊन आले होते. हे संकट कधी संपणार हेच आपल्याला माहिती नाही. यावेळी त्यांनी अंतिम परीक्षांसंबंधी सविस्तर भूमिका मांडली असून मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच ते काय बोलले आहेत याचा उलगडा होणार आहे.