लक्षणे असो वा नसो शहरातील सर्वांची ‘कोरोना’ टेस्ट, ‘या’ देशाने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसची (coronavirus) दुसरी लाट आली असून, पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लक्षण (-symptoms-or-not) असो वा नसो शहरातील सर्वांचीच कोरोना टेस्ट (corona-testing) करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर ब्रिटनने मोठा निर्णय घेतला आहे.

लिव्हरपूल शहरात सर्वांची चाचणी घेण्याचा निर्णय हा सध्या प्रायोगिक तत्वावर आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास देशातील इतर ठिकाणीही सर्वांचीच चाचणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन ब्रिटन सरकारने गुरुवारपासून एक महिन्यांसाठी लॉकडाउन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार
कोरोना टेस्ट दरम्यान लिव्हरपूल शहरात गोंधळ होऊ नये अथवा विरोध होऊ नये यासाठी लष्करालाही पाचारण केले आहे. सध्या सुरू असलेली स्वॅब टेस्ट आणि न्यलॅट्रल फ्लोद्वारे लिव्हरपूलमधील नागरीक आणि कामगारांची टेस्ट करण्यात येणार आहे. टेस्टचे निकाल एका तासात समोर येणार आहेत.

दोन हजार सशस्त्र जवान तैनात
इतर शहरात चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. संरक्षणमंत्री बेन वल्लास यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता दोन हजार सशस्त्र जवान तैनात करण्यात येणार आहेत. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मी सेल्फ क्वारंटाइन केल्याची त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. मी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाइन असणार आहे. घरूनच काम करणार असल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे.