Coronavirus : जर तुम्ही रोज ‘या’ चुका करत असाल तर ‘मास्क’ आणि ‘सोशल डिस्टेन्सिंग’चा काहीच उपयोग नाही, जाणून घ्या

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे सर्वत्र नैराश्येचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने लोकांना संक्रमण होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे लोकांचे आयुष्य खूपच बदलून गेले आहे. कोरोना पासून आपला बचाव करण्यासाठी लोक स्वत:ची काळजी घेत आहेत, सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. मात्र, काही लोक चुकाही करत आहे. या चुकांमुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना संक्रमण होण्याचा धोका वाढत आहे.

मास्क योग्य पद्धतीने न घालणे
कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. मास्कमुळे कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो. फक्त मास्कचा वापर नाही तर मास्क योग्य पद्धतीने लावणंही तितकंच गरजेच आहे. काही लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे नाकाद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून, तोंड, नाक झाकलं जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे गरजेचे आहे.

ADV

सॅनिटायजरचा सतत वापर
काही लोक पाणी आणि साबणाची उपलब्धता असली तरी सॅनिटायझरचा वापर करतात. सॅनिटायझरचा वापर गरजेपेक्षा जास्त वापर करतात. ज्यावेळी तुमच्याकडे साबण आणि पाणी उपलब्ध असेल तर सॅनिटायझरचा वापर करणे टाळा. ऑफिसमध्ये किंवा घरात पाण्याची उपलब्धता असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नका.

मास्कला सतत हात लावणं
कोरोना पासून बचाव करण्यासाठी नाकाला मास्क लावला जातो. पण काही लोक मास्क घातल्यानंतर अनेकदा मास्कला स्पर्श करतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आपला मास्क कोणालाही वापरण्यास देऊ नका. संक्रमण टाळण्यासाठी एकदा मास्क लावल्यानंतर पुन्हा हात लावू नका.

बाहेरून आणलेले सामान लगेच उपयोगात आणणे
नेहमी बाहरून कणतंही सामान आणल्यानंतर डिइंफेक्टंट स्प्रेच्या मदतीने शिंपडा. त्यानंतर सामानाचा वापर करा. भाज्या आणि फळांना डिइंफेक्टंट वापरण्यापेक्षा गरम पाण्याने स्वच्छ धुवून मगच त्याचा वापर करा. जेणेकरून वस्तूंमार्फत संक्रमण पसरणार नाही.