Coronavirus : भारताला आतापर्यंतचं सर्वात मोठं यश ! 24 तासांत तब्बल 260 रूग्णांनी केली ‘कोरोना’वर मात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या कहरामुळे लोक खूप घाबरले आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, काही राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आता भारताने कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत भारतात 1,748 रुग्ण बरे झाले आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13,387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा 437 इतका आहे.

मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल परंतू, त्यानंतर रुग्णांची संख्या हळूहळू कमी होईल, असे गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर हा लॉकडाउन पुन्हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाउनमध्ये पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत चांगले निकाल दिसून येत आहे.

राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी योग्यवेळी लॉकडाउन लागू केले होते. त्यामुळे तेथे चांगला परिणाम दिसून आला. या तिन्ही राज्यात कोरोना विषाणूची लागण सर्व झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. भारतात कोरोना रुग्णांची चाचणी आता वेगाने घेण्यात येत आहे. ज्या लोकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे.

मेच्या पहिल्या आठवड्यानंतर मिळणार आनंदाची बातमी
येणाऱ्या दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना चाचणी जसजशी वाढेल तसतशी लोकांची संख्याही वाढेल. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनमध्ये 19 दिवसांसाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवला. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा 12,000 च्या पुढे गेला असताना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये 36,000 लोकांना सरकारी रुग्णालयात किंवा घरी आयसोलोशनमध्ये ठेवण्यात आले आहे.