Coronavirus In India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 48648 नवे पॉझिटिव्ह तर 563 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 80.88 लाखावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा एकुण आकडा 80 लाख 88 हजार 851 झाला आहे. 24 तासात कोरोनाच्या 48 हजार 648 नव्या केस सापडल्या आणि 563 लोकांचा मृत्यू झाला. संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 21 हजार 90 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब ही आहे की, आतापर्यंत 73 लाख 73 हजार 375 लोक बरे झाले आहेत. यादरम्यान, 85 दिवस म्हणजे 3 महिन्यानंतर अ‍ॅक्टिव्ह केस पुन्हा कमी होऊन 6 लाखांपेक्षा कमी झाल्या आहेत. आता देशात 5 लाख 94 हजार 386 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे ओव्हरऑल अ‍ॅक्टिव्ह केस कमी होत आहेत, तर 3 राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. यामध्ये दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालचा प्रामुख्याने समावेश आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून या राज्यात कोरोना केस सतत कमी होत होत्या, ज्या पुन्हा वाढू लागल्या आहेत.

महाराष्ट्रात 5902 नवे रूग्ण सापडले
महाराष्ट्रात गुरूवारी कोरोनाचा संसर्ग झालेले 5902 लोक सापडले. यामुळे एकुण रूग्णांचा आकडा वाढून 16 लाख 66 हजार 668 झाला आहे. यामध्ये 1 लाख 27 हजार 603 रूग्णांवर उपचार सुरू आहे, तर 14 लाख 94 हजार 809 लोक बरे झाले आहेत. संसर्गामुळे आतापर्यंत 43 हजार 710 लोकांना आपला जीव गमावला आहे.