Coronavirus : पुणे पोलिसांनी ‘गजनी’मधील आमिर खानच्या फोटोव्दारे दिला ‘संदेश’, लिहिलं मजेशीर ‘कॅप्शन’

पोलिसनामा ऑनलाइन –पुणे पोलिसांनी आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एका सिनेमाचं पोस्टर वापरलं आहे ज्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. त्यांची ही क्रिएटीविटी साऱ्यांनाच आवडली आहे.

मास्क लावायला विसरू नका

पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटरवरून गजनी सिनेमातील आमिर खानचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी आमिर खानच्या तोंडाला मास्क लावला आहे. यात त्यांनी लिहिलं की, सर्वकाही विसरून जावा परंतु मास्क लावायला विसरू नका.

फोटो शेअर कतरताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, मास्क लावा, सोशल डिस्टेंसिंग कायम ठेवा. आपले हात सतत धुवत रहा. आपल्या शरीराला टॅटूनं कवर करायची गरज नाही. तुम्ही कराल ? असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनीही कोरोनासंदर्भात लोकांची जागरूकता करताना बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूरच्या स्त्री सिनेमातील फेमस डॉयलॉग ओ स्त्री कल आना चा वापर केला आहे. ओ स्त्री कल आना याऐवजी पोलिसांनी ओ कोरोना कभी मत आना असं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विट करताना पोलिसांनी म्हटलं की, “सर्वांना सुक्षित ठेवण्याचा एकमात्र मंत्र आहे की, आम्ही रस्त्यावर येऊ नये.”

श्रद्ध कपूरनंही मुंबई पोलिसांची ही पोस्ट आपल्या इंस्टावरून शेअर केली आहे. श्रद्ध म्हणाली की, “एकदम बरोबर आहे. रिपोस्ट.सर्वांना सुक्षित ठेवण्याचा एकमात्र मंत्र आहे की, आम्ही रस्त्यावर येऊ नये.”