होय, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार मात्र स्वरूप बदलणार

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सरकारने सर्व शांळा व कॉलेज देखील बंद करण्यास सांगितले आहे. कोरोनामुळे या मुलांच्या परिक्षेच्या तारखा देखील पुढे घेण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले असले तरी भविष्यात या सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा होणार आहे. कोणतीही परिक्षा रद्द केली जाणार नाही. परंतु, परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यासाठी विद्यापीठ सध्या गांभीर्याने विचार करत आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सर्व परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्याचबरोबर 1 एप्रिल ते 14 एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या पुर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरु झाल्या होत्या मात्र पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अजूनही सुरु झाल्या नाही. कोरोनामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती.

याबाबत उपकुलगुरु डॉ. एन.एस उमराणी म्हणाले की, कोणत्याही अभ्यासक्रमाची परिक्षा रद्द केली जाणार नाही. सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहे. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करुन नवीन परीक्षा पद्धत ठरवली जाईल.

डॉ. एन.एस उमराणी म्हणाले की, 13 ते 17 या कालावधीमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही पेपर झाले आहे. तसेच त्यांना क्रेडिट सिस्टीम असल्याने या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्ष जाताना मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या एमसेक्यू किंवा कमी गुणांची यासह इतर प्रकारे परीक्षा होणार आहे. याचा निर्णय लवकरच परीक्षा मंडळात घेतला जाईल. प्रथम वर्षाची परीक्षा रद्द होणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like