Corona Virus : ‘या’ व्यक्तीमुळं फोफावला ‘कोरोना’, ‘गायब’ झालेला सापडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोना व्हायरसची मोठी दहशत आहे. चीनमधून सुरु झालेल्या या साथीने पुढे भयानक रूप धारण केले आणि आता आजार इतर देशांमध्ये देखील पसरू लागला आहे. मात्र नेमकं या आजराची सुरुवात कोणत्या व्यक्तीपासून झाली याचा शोध सुरु होता अखेर याचा उलगडा झाला आहे. स्टिव्ह वॉल्श असं या व्यक्तीचं नाव असून ती पेशानं व्यवसायिक आहे. स्टिव्ह यांच्यावर लंडनमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टिव्ह पूर्णपणे बरे झाले असले, तरी त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

जानेवारी महिन्यात स्टीव्ह एका ब्रिटनमधील विक्री परिषदेला गेले होते त्याच ठिकाणी त्याला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे समजते. आणि त्यानंतर स्टिव्ह कडून इतर देशांमध्ये कोरोना पसरल्याने त्यांना सुपर स्प्रेडर असे म्हणण्यात आले.

नेमका कशा प्रकारे पसरला कोरोना
स्टीव्ह ज्या परिषदेच्या कार्यक्रमासाठी गेला होता त्या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला. यानंतर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर सर्व लोकांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत १०९ पैकी ९४ जण मायदेशी परतले होते. त्यामुळे जीवघेणा कोरोना विषाणू पसरत गेला. सिंगापूरमधल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले दक्षिण कोरियाचे दोन जण मलेशियन व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू दोन नातेवाईकांच्या शरीरात पसरला.

स्टीव्ह परिषद संपल्यानंतर फ्रान्समध्ये सुट्टीसाठी गेला होता त्याआधी त्याच्या संपर्कात आलेल्या चार ब्रिटन मित्रांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढेच नाही तर स्टीव्हच्या संपर्कातील एका स्पॅनिश नागरिकाला देखील कोरोनाची बाधा झाली त्यानंतर ही व्यक्ती स्पेनमध्ये गेली असता तिच्याद्वारे अकरा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे कोरोना एकाकडून दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पसरत गेल्याचे समोर आले आहे.