Coronavirus : ‘डोनेशन’च्याबाबतीत बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड ‘सरस’ ! ‘या’ कलाकरांनी केली सढळ हातांनी कोट्यावधींची ‘मदत’


पोलीसनामा ऑनलाईन :
कोरोना व्हायसरनं पूर्ण देशालाच आपल्या विळख्यात पकडलं आहे. या घातक महमारीनं बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारनं पूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे. या संकटाच्या काळात अनेक मोठे कलाकार मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी बाधितांची मदत करण्यासाठी पैसे डोनेट केले आहेत. काहींनी अन्नधान्यही डोनेट केलं आहे. यात साऊथ सुपरस्टार रजनीकांत, प्रभास आणि महेश बाबू तसेच चिरंजीवी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

बाहुबली फेम प्रभासनं कोरोनासारख्या महामारी सोबत लढण्यासाठी 4 कोटी दान केले आहेत. त्यानं 3 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीत आणि 50-50 लाख रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीत दान केले आहेत.

पवन कल्याण यानं दोन कोटी तर त्याचा पुतण्या रामचरण यानं 70 लाख आणि त्याचे वडिल तेलगू सुपरस्टार चिरंजीवीनं 1 कोटी दान केले आहेत. युवा सुपरस्टार महेश बाबू यानंही 1 कोटी रुपये मदत निधीत दान केले आहेत.

बॉलिवूडबद्दल बोलायचं झालं तर इथं सुपरस्टार सोशल मीडियावरून लोकांना घरात सुरक्षित राहण्यासाठी तर अपील करत आहेत परंतु सरकार किंवा लोकांची मदत आर्थिक मदत करण्यासाठी खूपच कमी लोक समोर येताना दिसत आहेत. कपिल शर्मानं पीएम मदत नधीत 50 लाख रुपये दान केले आहेत. हृतिक रोशन यानं बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनला 20 लाख रुपये दान केले आहेत. सिंगर हंस राज हंसनेही 50 लाखांची मदत केली आहे.