Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’ला डीअ‍ॅक्टिव्हेट करणारी ‘मशीन’ तयार, ’सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क’ संस्थेचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ’सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क’ या संस्थेने कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच डीअ‍ॅक्टिव्ह करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मशीन कसे काम करते याची माहिती मागवली आहे. मशीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला असल्याची माहिती संस्थेचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.

नायडू हॉस्पिटलमध्ये अशा चार मशीन बसवण्यात आल्याच ’सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क’ या संस्थेचे महासंचालक जगदाळे यांनी सांगितले आहे. हे सायट्रिक एरॉन जनरेटर आहे. यातून दर सेकंदाला जवळपास कोटी नेगेटिव्ह आयर्नन्स जनरेट होतात. हे निगेटिव्ह आयर्नन्स म्हणजे, ऑक्सिजन जनरेट होतो ज्याला नेगेटिव्ह चार्ज असतो. हा नेगेटिव्ह चार्ज ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर हवेत तयार केला जातो. तो अतिशय क्षणिक असतो. तो फार काळ टिकत नाही. मात्र तो अतिशय अ‍ॅक्टिव्ह असतो. हवेतील मॉयश्चरशी तो रिअ‍ॅक्ट करतो. त्यातून तो हायड्रॉक्साइड आयर्न आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड असे दोन नेगेटिवन्ह आयर्न तयार करतो. हे दोन्ही आयर्न रिअ‍ॅक्टिव्ह असतात. निसर्गात त्यांना अ‍ॅटमॉस्फरीक डिटर्जेंट असे म्हटले जाते. हे हवेतील धूळ, प्रदूषण, व्हायरस डिअ‍ॅक्टिव्हेट करत असल्याचा दावा केला आहे.

व्हायरस जर एखाद्या सजीवाच्या पेशीमध्ये गेला तरच तो अ‍ॅक्टिव्ह होतो.’ संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झाले असतानाच पुण्यातील ’सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क’ या संस्थेने तयार केलेले मशीन एक आशेचा किरण ठरणार आहे. जीवघेण्या कोरोनाचा विषाणू मानवाच्या शरीरात जाण्याआधीच हे मशीन डीअ‍ॅक्टिव्ह करत आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे मशीन अत्यंत उपयोगी ठरणार आहे.