लस घेण्यासाठी कोणती चांगली वेळ ‘सकाळ’ की ‘रात्र’?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लस (vaccine ) हे प्रभावी शस्त्र मानले जात आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. पण ही लस कधी घ्यावी, सकाळी की रात्री घ्यावी जेणेकरून त्याचा फायदा अधिक होईल, यावर संशोधन झाले आहे. संशोधनातून सकाळी लस vaccine घेण्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही दिवसा अन रात्री प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असते. आपल्या शरीराचा बॉडी क्लॉक, हे त्यामागचे कारण आहे. लस vaccine ही एका विशिष्ट रोगाच्या विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी बनवली जाते. आपल्या शरीरातील बॉडी क्लाक अन् लस याचे समीकरणही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे दिवसा लस दिली जाते, कारण त्यावेळी शरीराची बॉडी क्लॉक व्यवस्थितपणे सुरु असते. सकाळी लस दिल्याचा अधिक चांगला परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीतही फरक जाणवतो. दिवसा लस देण्यामागचे कारण आहे की, शरीराच्या बॉडी क्लॉकनुसार आपण आपल्या झोपेवर नियंत्रण करु शकतो.

रात्रीच्या वेळी शरीरात थकवणार केमिकलची निर्मिती
आपल्या शरीरातील बॉडी क्लॉकनुसार, शरीरातील पेशींच्या कार्यप्रणालीत 24 तासांची लय vaccine निर्माण होते. उदाहरणार्थ, आपले बॉडी क्लॉक सुनिश्चित करते की, रात्रीची वेळ ही फक्त झोपण्यासाठी आहे .त्यामुळे रात्र होताच आपण केवळ मेलाटोनिनच उत्पादन करतो. हे एक प्रकारचे केमिकल असते अन् ते आपल्या शरीराला थकवते. त्यामुळे हे केमिकल आपल्याला झोपण्याची वेळ झाल्याचे संकेत देत असतात.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’