लॉकडाऊन 5.0 बाबत कोणत्या प्रकारचे प्रस्ताव येतायेत समोर ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. या दरम्यान, पाचव्या लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. कित्येक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन आणखी विश्रांतीसह 15 जूनपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. गुरुवारी, 28 मे रोजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी बैठक घेतली. या बैठकीत पहिल्यांदाच कोरोना बाधित महानगरांचे महानगरपालिकाचे आयुक्तही यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. पंतप्रधानांनी कोरोनाशी लढण्यासाठी 21 दिवसांची मुदत मागितली. नंतर लॉकडाऊन वाढत गेले आणि आता दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. त्याचबरोबर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.

एका माध्यमाच्या अहवालानुसार 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतील. अशी अपेक्षा आहे की, पंतप्रधान रेडिओ प्रोग्राममध्ये लॉकडाउन 5.0 संदर्भात देखील बोलू शकतात. तसेच, पंतप्रधान या कार्यक्रमात देशातील बर्‍याच भागांवरील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करू शकतात, असे म्हंटले जात आहे.

त्याचप्रमाणे आणखी एका वृत्तपत्राद्वारेही अशीच एक बातमी समोर आली आहे. असे म्हटले आहे की, लॉकडाउन 5 प्रामुख्याने 11 शहरांवर लक्ष केंद्रित असेल. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, पुणे, ठाणे, इंदोर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाताचा समावेश आहे. या शहरांमध्ये 70 टक्के पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे आहेत. अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता, मुंबई या पाचही शहरांमध्ये 60 टक्के प्रकरणे आहेत. माध्यम अहवालात म्हटल्यानुसार, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्राकडून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु यावेळी काही नियम व अटी लागू राहतील. धार्मिक ठिकाणी कोणतीही यात्रा किंवा उत्सव साजरा करण्यास कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच, मोठ्या संख्येने लोक एकत्र होणार नाहीत.

मास्क घालणे आणि सामाजिक अंतरण अनिवार्य असेल. कर्नाटक सरकारने यापूर्वीच पंतप्रधान मोदींना सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पीएमओला पत्रही लिहिले आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउन 5.0 दरम्यान कंटेनमेंट झोन वगळता सर्व झोनमध्ये सलून आणि जिम उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, या दरम्यान कोणतीही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ उघडण्याची परवानगी नाही. तसेच मॉल आणि मल्टिप्लेक्स देखील बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे लग्न आणि अंत्यसंस्कारात आणखी काही लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा आढावा अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु हा एक राजकीय निर्णय असेल कि, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सुरू ठेवायचा आहे, किंवा एक जूनपासून राज्यांना कश्या प्रकारे पुढे जात येईल, या संदर्भात अंतिम सूट देण्यात यावी.

केंद्राने स्वतंत्रपणे गोळा केलेला डेटा अधिकारी स्कॅनही करीत आहेत. त्याच वेळी, अश्या बातम्या समोर आल्यानंतर गृह मंत्रालयाकडून एक निवेदन आले, ज्यात म्हटले की, अशा सर्व गोष्टी केवळ अटकळ असतात. असे अहवाल निराधार आहेत. असे अनुमान गृह मंत्रालयाशी जोडणे योग्य नाही. दरम्यान, लॉकडाउन पुढे वाढेल कि नाही ? जर ते वाढले तर त्याचे स्वरूप काय असेल ते 31 मे पर्यंतच कळेल. केंद्र सरकारने लॉकडाउन 5 साठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून सूचना मागविल्या आहेत. या सूचना देण्यासाठी राज्यांना शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्राने राज्यांकडून ब्लूप्रिंट्स मागितली आहेत.