‘मास्क’ न घालता खेळायला गेली ‘ती’ आणि हंसाने घडवली चांगली ‘अद्दल’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनोमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे जगभरात प्रकोप वाढला आहे. नागरिकांना वारंवार मास्क घाला सोशल डिस्टन्सिंग बाळगा हे सांगूनही अनेकांकडून पालन केले जात नाही.. मास्क लावण्याऐवजी तो गळ्यावर लटकवला जातो. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून माणूसच नाही तर प्राणीही जागृत होत असल्याचे व्हिडीओ अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाचा कहर प्राण्यांना कळतोय पण माणसाला कळून वळत नाही. असाच एक प्रकार घडला. पार्कमध्ये एक महिला मास्क तोंडावर न लावता गळ्यात अडकवून हंसासोबत खेळायला गेली होती. हंसाने मात्र या महिलेला मास्क न लावल्यामुळे अद्दल घडवली आहे. या महिलेला मास्क योग्य पद्धतीने न घातल्याचा धडा मिळाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हंसाने महिलेला मास्क न घातल्यामुळे मारत तिचा मास्क तोंडावर आणला आहे. हा व्हिडीओ एक संदेश देणारा आहे. माणसांना नाही पण प्राण्यांना कळतंय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क नीट वापरायला हवा आणि सोशल डिस्टन्सिंग बाळगायला हवे असे अधिकारी सुशांत नंदा यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 24 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.