रात्री येणाऱ्या खोकल्यानं त्रस्त आहात ? जाणून घ्या कारणं आणि 4 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना रात्री खोकला येण्याचा त्रास असतो. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर वेळीच काळजी घ्या. आपण याची कारणं आणि काही घरगुती उपाय जाणून घेणार होतो ?

का येतो रात्री खोकला ?

ज्या लोकांच्या श्वसननलिकेत म्यूकस वाढतो त्यांना रात्री खोकला येतो. साधारणपणे सायनसनं ग्रस्त असणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होतो.

रात्री खोकला आल्यास काय करावं ?

जर तुम्हाला सायनस असेल आणि रात्री खोकला येत असेल तर अशा लोकांनी म्यूकस वाढणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी सायनसच्या रुग्णांनी रात्री चिकट पदार्थ जसे की, लोणी किंवा तूप खाऊ नये. यामुळंही खोकला अधिक वाढतो.

तुम्हाला रात्री खोकला येत असेल तर काही घरगुती उपाय करूनही तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊयात काही उपाय

1) मध आणि आलं – आलं बारीक करून त्यात काही थेंब मध घाला. हे मिश्रण काही काळ चाटत रहा. यामुळं खोकला दूर होतो.

2) हेही असू शकतं कारण – रात्री खोकला येत असेल तर तुमची रूम स्वच्छ नसणं हेही एक कारण असू शकतं. यासाठी नियमित रूम स्वच्छ ठेवा. कारण रूमधील धूळ नाकावाटे फुप्फुसात गेल्यानंही खोकला येतो.

3) कफ – जर तुम्हाला कफ झाला असेल तर यानंही रात्री खोकला येतो. जर कफ झाला असेल तर यासाठी औषध घ्या यामुळं शांत झोप लागेल.

4) गरम पाणी – रात्री खोकला येण्यावर गरम पाणी हाही एक चांगला उपाय आहे. यामुळं घशात असणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय कफ विरघळण्यासही याची मदत होते आणि तुमचा खोकला थांबतो.