Video : संपुर्ण देशभरात तिन्ही सैन्य दलांकडून कोरोना ‘वॉरियर्स’वर पुष्पवृष्टी करून सॅल्यूट, म्हणाले – ‘धन्यवाद’

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना व्हायरसविरोधात लढा देणार्‍या योद्धांना तिन्ही सैन्य दलाकडून सलामी देण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात दोन हात करत आहेत. जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे या योद्ध्यांना तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.

इंडियन एअर फोर्सतर्फे फ्लाय पास्टचे आयोजन करण्यात आले आहे. कश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येणार आहे. यामध्ये भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश असणार आहे. तर समुद्रातूनही भारतीय नौदलांकडूनही या योद्ध्यांना सलामी देण्यात येणार आहे. यावेळी 24 बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे.

गुजरातच्या पोरबंदर, मुंबई, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकता येथील बंदरावर सायंकाळी 7 वाजता आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्डचे वादन होणार आहे. एम्स, नरेला क्वारंटाईन सेंटर आणि ब्रिगेड हॉस्पिटलशेजारी बॅण्डचे वादन करण्यात येणार आहे.