COVID-19 : ‘लॉकडाऊन’मध्ये नाही होऊ शकलं ‘वेडिंग फंक्शन’, अभिनेत्री पूजा बॅनर्जीनं ‘कोरोनाग्रस्तां’साठी दान केली सर्व ‘रक्कम’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन पार्ट 2 सुरू आहे. अशा देश एकत्र येऊन कोरोना व्हायरससोबत लढा देत. या लढ्यात अनेकजण योगदान देत आहे. अशात अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणा वर्मा यांनीही एक मदत करून एक मिसाल दिली आहे.

पूजा आणि कुणाल यांनी गेल्या महिन्यातच कोर्ट मॅरेज केलं आहे. 15 एप्रिल रोजी ते वेडिंग फंक्शन करणार होते. परंतु आता लॉकडाऊन वाढल्यानं फंक्शन होऊ शकणार नाही. अशात या कपलनं फंक्शनमध्ये खर्च करण्यासाठी ठेवलेली रक्कम कोरोनाच्या लढ्यात दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूजा बॅनर्जीनं सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. पूजानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. पूजानं लाहिलं की, “हा फोटो मागील वर्षातला आहे जेव्हा मी सिंदूर खेळले होते. आज आम्ही लग्न करणार होतो. परंतु सद्य परिस्थिती पाहता आम्ही सर्व प्रोग्राम कॅन्सल केले आहेत. तसं तर आम्ही लग्नाची नोंदणी एका महिन्यापूर्वीच केली आहे. ऑफिशियली आम्ही मॅरिड आहोत.”

आपल्या पोस्टमध्ये पुढे पूजा म्हणते, “आम्ही तर आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. पंरतु आम्हाला त्या लोकांची चिंता आहे जे जीवनासाठी संघर्ष करत आहेत किंवा ज्यांनी आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य गमावला आहे. आम्ही तुम्हा सर्वांसाठी प्रार्थनेसोबतच एक छोटीशी मदत किंवा योगदान म्हणून लग्नाच्या फंक्शनला जी रक्कम खर्च करणार होतो ती रक्कम त्यांना देत आहोत ज्यांना याची गरज आहे. ही वेळ आनंद साजरा करण्याची अजिबात नाही. जेव्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल तेव्हा आम्ही एक दिवस प्रिय लोकांसोबत पुन्हा सेलिब्रेट करू. जय माता दी.”

पूजा सांगते की, पॅरेंट्स आणि ग्रँडपॅरेंट्सच्या आशीर्वादानं त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. आम्हाला तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाचीही गरज आहे.