Good News ! डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार ‘कोरोना’ची लस ? पुण्यातून समोर आली मोठी बातमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    कोरोनाच्या लसीबाबत (Corona Vaccine) पुण्यातून आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया कोविड 19 लसीसाठी आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे. या लसीच्या सुरक्षेबाबत सध्या कोणताही प्रश्न नाही. मात्र दीर्घकाळ काय परिणाम होतात हे समजण्यासाठी 2-3 वर्षांचा काळ जावा लागेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

अदार पूनावाला महणाले, डिसेंबर पर्यंत कोरोनाची लस येईल परंतु त्यासाठी इमर्जंसी ही लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे. जर ही परवानगी मिळाली तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते. सर्व मानवी चाचण्या पूर्ण केल्यानंतर जानेवारीत ही लस येईल अशी माहिती पूनावाला यांनी दिली.

ऑक्सफर्ड आणि सीरम इंस्टिट्युटनं तयार केलेल्या या कोरोना लसीची चाचणी ब्रिटनमध्ये देखील सुरू आहे. त्यांनी हा डेटा सर्वांना दिला तर आपत्कलाईन चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाकडं अर्ज करणं सोपं जाईल. आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं.