‘कोरोना’ होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढलेल्या देशात आता आणखी एक वेगळे रुप घेतले आहे. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका त्या व्यक्तीला होऊ शकतो की नाही याबाबत सध्या अनेक निरीक्षणे सुरू आहेत. गुजरातमधील अहमदाबाद इथे 54 वर्षीय महिलेला दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिलेचा दुसर्‍यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हाँगकाँग, नेदरलँड आणि बेल्झियम नंतर आता भारताचाही नंबर लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी अथवा महिन्यांनी पुन्हा संसर्ग होऊ शकतो अशी घटना समोर आली आहे. याचे प्रमाण आता कमी असले तरीही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद इथल्या इसानपूर भागातील एप्रिल महिन्यात कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. 4 महिन्यांनंतर पुन्हा या महिलेची चाचणी घेतल्यानंतर मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रतन रुग्णालयात या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये ही महिला संक्रमित असल्यामुळे खळबळ उडाली आहे.