Coronavirus : देशात 24 तासात 4970 नवे रुग्ण तर 134 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांचा आकडा 1 लाखाहून जास्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून मंगळवारी सकाळी देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे. देशात सध्या १ लाख १ हजार १३९ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.

देशात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. तेव्हापासून १०९ दिवसात देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख झाली आहे. गेल्या १२ दिवसात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे.
गेल्या २४ तासात देशभरात ४ हजार ९७० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशभरात ५८ हजार ८०२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात देशभरात १३४ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३ हजार १६३ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे.

देशभरातील रुग्णालयातील २ हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३९ हजार १७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी देशात केवळ ३ कोरोना बाधित होते. त्यानंतर १४ मार्च रोजी कोरोना बाधितांची संख्या १०० झाली होती.

कोरोना बाधितांची संख्या अशी वाढत गेली
२९ मार्च १०२४
७ एप्रिल ५३५१
१३ एप्रिल १०४५३
२१ एप्रिल २००८०
२ मे ३९६९९
६ मे ५२९८७
१४ मे ८१९९७
१८ मे १०११३९