पालघर लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिल्याचे आज जाहीर करण्यात आले. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच माकप लोकसभेची जागा लढणार नसल्याचे अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी सांगितले आहे. बविआचे हितेंद्र ठाकूर आणि अशोक ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचा निर्णय जाहीर केला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी माकप आग्रही होती. काँग्रेस आघाडीने हि जागा माकपला सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागी माकप आपला उमेदवार उभा करणार आहे. बविआला पालघरमध्ये माकप मदत करणार तर दिंडोरीत बविआ माकपला मदत करणार असे लढ्याचे सूत्र दोन्ही पक्षाने निश्चित केले आहे. शिवसेना भाजपचा पराभव घडवून आणण्यासाठी माकप आणि बविआ यांनी एकत्र येण्याची अवश्यता आहे असे एकमत दोन्ही पक्षांत झाल्याने त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान श्रीनिवास वनगा यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी शिवसेनेने हा मतदासंघ भाजपकडून मागून घेतला आहे. भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरच्या जागेवर भाजपच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक लढवत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us