गृहमंत्री अमित शाहांनी दिला ‘या’ मोठ्या पदाचा राजीनामा, 2014 पासुन सांभाळत होते जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी गुजरातमधील क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्ष पद सोडलं आहे. त्यामुळे हे पद आता रिक्त झालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या जागेवर एखाद्या नव्या अध्यक्षांची निवड होण्यासाठी वेळ लागू शकतो. अमित शहा 2014 मध्ये जीसीएचे अध्यक्ष बनले होते. त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमानातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा घेतली होती.

मोदींनी पीएम पद सांभाळण्यासाठी जीसीए अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. अमित शहा यांनी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींनुसार, कोणताही मंत्री किंवा सरकारी कर्मचारी असोसिएशनचे पद घेऊ शकत नाही.
amit shah, amit shah gujarat cricket, gujarat cricket association, gujarat cricket association president, parimal nathwani, अमित शाह, गुजरात क्रिकेट, गुजरात क्रिकेट एसोसिएशन अध्‍यक्ष
जीसीए उपाध्यक्षांचाही राजीनामा
जीसीएचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा धनराजने ही जबाबदारी सांभाळली आहे. असे म्हटले जात आहे की, परिमल नाथवानी गुजरात क्रिकेटचे नवे अध्यक्ष बनू शकतात. सरदार पटेल स्टेडियमच्या नवनिर्माणाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

अमित शहा अध्यक्ष असताना सुरु झालं होतं पटेल स्टेडियमचे नूतनीकरण
अमित शहा अध्यक्ष असताना अहमदाबादच्या मोटेरामधील सरदार पटेल स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. हे काम जवळपास पू्र्ण होत आले आहे. काही महिन्यांनी हे अधिकृतपणे खुलं करण्यात येईल आणि इथे सामने खेळले जाताना दिसतील. सरदार पटेल स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असेल. या स्टेडियममध्ये 1.10 लाख लोक बसू शकतील. याआधी याची प्रेक्षक क्षमता 50 हजार होती. याची निर्मिती 1982 मध्ये करण्यात आली होती. याला पुन्हा बनवण्यासाठी 2017 मध्ये काम सुरु करण्यात आलं होतं. जुनं बांधकाम हटवण्यासाठीच 9 महिन्यांचा कालावधी लागला होता.
amit shah, amit shah gujarat cricket, gujarat cricket association, gujarat cricket association president, parimal nathwani, अमित शाह, गुजरात क्रिकेट, गुजरात क्रिकेट एसोसिएशन अध्‍यक्ष
सरदार पटेल स्टेडियममध्ये झाले अनेक कमाल
या स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेटचे अनेक महत्त्वपूर्ण कारनामे झाले आहेत. यात 1987 मध्ये सुनील गावस्कर यांचे टेस्ट मॅचमध्ये 10 हजार रन, 1994 मध्ये कपिल देव यांच्या टेस्ट मॅचमधील 434 विकेट, 1999 मध्ये सचिन तेंडुलकर यांची टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी आणि 2011 च्या वर्ल्डकपमधील भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय समाविष्ट आहे.

Visit : Policenama.com