वॉर्नरने रचला ‘विक्रम’ ! डे-नाइट टेस्ट सामन्यात ‘तिहेरी’ शतक करणारा ‘दुसरा’ फलंदाज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बऱ्याच काळानंतर आज फॉर्मात आलेल्या डेविड वॉर्नरने इतिहास रचला आहे. पाकिस्तानच्या विरोधात एडिलेड टेस्ट सामन्यात दुसऱ्या दिवशी त्याने तिहेरी शतक केले. डे नाइट कसोटी सामन्यात इतिहास रचत त्याने तिहेरी शतक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. वॉर्नर तिहेरी शतक करणारा सातवा ऑस्टेलियन ठरला आहे. वॉर्नरच्या आधी अजहर अली ने डे नाइट टेस्ट सामन्यात तिहेरी शतक केले आहे.

हा वॉर्नरचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोर आहे. याआधी पहिल्या टेस्ट क्रिकेटमध्ये वॉर्नरचा सर्वाधिक स्कोर 253 धावांचा होता. जो त्याने न्यूझीलंडच्या विरोधात 2015 साली पर्थवर खेळताना केला होता. एलिडेटमध्ये त्याने मोहम्मद अब्बासच्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. तिहेरी शतक करत वॉर्नरने मोठा रेकॉर्ड केला. एडिलेड ओवलवर टेस्ट क्रिकेटमध्ये हा एखाद्या खेळाडूचा सर्वात मोठा स्कोर आहे. याआधी हा रेकॉर्ड डॉन ब्रॅडमॅनच्या नावावर होता. ज्यात त्याने 88 वर्षांपूर्वी 1931-1932 च्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोध 299 धावांचा खेळ खेळला होता.

बऱ्याच काळानंतर कसोटी क्रिकेटममध्ये शतकी खेळी एखाद्या खेळाडूने केली आहे. 2016 मध्ये भारताच्या करुण नायरने इंग्लंडच्या विरोधात तिहेरी शतक जोडले होते. करुण नायरने नाबाद 303 धावा बनवल्या होत्या. त्याआधी पाकिस्तानच्या अजहर अलीने 13 ऑक्टोबर 2016 साली वेस्टइंडिजच्या विरोधात नाबाद 302 धावा केल्या होत्या. जे डे नाइट कसोटी सामन्यातील पहिले तिहेरी शतक होते.

Visit : Policenama.com