IND Vs SA : ‘हिटमॅन’ रोहितचं सलग तिसरं शतक, ब्रेक केले अनेक मोठे ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज सलामीवीर रोहित शर्मा याने शानदार शतक झळकावत आपल्या कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने कसोटी सामन्यांमधील दोन हजार धावा देखील पूर्ण केल्या. या मालिकेतील रोहितचे हे तिसरे शतक असून त्याने 30 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही डावांत त्याने शतक झळकावले होते.

या विक्रमाबरोबरच विदेशी मैदानावर एकही शतक न झळकावता भारतीय मैदानांवर सर्वात जास्त शतके झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याची सर्व सहा शतके हि घरच्या मैदानांवर आली असून विदेशी मैदानावर त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. या यादीमध्ये बांग्लादेशच्या मोमिनुल हक याचा प्रथम क्रमांक असून त्याने विदेशात एकही शतक न झळकावता घरच्या मैदानावर आठ शतके झळकावली आहेत. याचबरोबर रोहित शर्माने एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील केला आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत 16 षटकार खेचले असून त्याने विंडीजच्या शिमरॉन हेटमायर याच्या 15षटकारांचा रेकॉर्ड मोडला आहे.

षटकार मारून केले शतक पूर्ण
डावाच्या 45 व्या षटकात रोहित शर्माने शानदार षटकार खेचत आपले शतक साजरे केले. तसेच त्याने सर्वाधिक वेळा षटकार मारून शतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने आतापर्यंत दोन वेळा असा पराक्रम केला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर याने सहा वेळा तर गौतम गंभीर याने दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.

या मालिकेत तीन किंवा अधिक शतके झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामी फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी सुनील गावस्कर यांनी 1970-71 मध्ये विंडीजविरुद्ध चार शतके, तर 1978-79 मध्ये घरच्या मैदानावर चार तर 1977-78 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन शतके झळकावली होती.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या