ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये ‘या’ 4 संघांचे तिकीट नक्की !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्डकप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ – आणि आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.

या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत  उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र इतर संघ देखील उत्तम खेळ करत असून स्पर्धेच्या मध्यंतरानंतर देखील हे चार संघ कोणते आहेत हे नक्की कुणीही सांगू शकत नाही. यावेळी स्पर्धा राउंड रॉबिन या पद्धतीने खेळवण्यात येत आहे.

२७ वर्षानंतर आयसीसीने या पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने प्रत्येक संघाचे नऊ सामने होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला हि स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून आपल्याला दिसून येत आहे कि गुणतालिकेतील सर्वात वरचे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. यातील भारत आणि न्यूझीलंड या दोन संघानी आतपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे त्यांचे स्थान जवळपास नक्की समजले जात आहे.

दरम्यान, ९ जुलैपासून सेमीफायनलला सुरुवात होत असून ९ जुलै रोजी पहिला सामना तर ११ जुलै रोजी दुसरा सामना खेळवण्यात येईल. तर अंतिम सामना १४ जुलै रोजी खेळवण्यात येईल.

कोण – कोण आहेत हे चार संघ

१) ऑस्ट्रेलिया
आतापर्यंत त्यांचे सहा सामने झाले असून त्यांनी पाच सामन्यांत विजय मिळवले असून त्यांचे १० गुण झाले असून गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यात त्यांनी पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, आणि अफगाणिस्तानवर त्यांनी विजय मिळवला असून फक्त भारताविरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचे इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडबरोबर सामने बाकी असून यापैकी आणखी दोन सामन्यांत त्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे.

२) भारत
भारतीय संघाचे या स्पर्धेत आतपर्यंत चार सामने झाले असून या चार सामन्यांत भारताने तीन विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारताचे सध्या सात गुण गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर असून भारताने यात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला असून भारताचे श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानबरोबर सामने बाकी आहेत. भारताला आणखी चार सामन्यांत विजय आवशयक असून त्यानंतर भारतीय संघाचे सेमीफायनलमधील स्थान पक्के होईल.

३) न्यूझीलंड
न्यूझीलंडचे आतापर्यंत पाच सामने झाले असून त्यांनी चार सामन्यांत विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. न्यूझीलंडने आतापर्यंत बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले असून भारताविरुद्ध सामना रद्द झाला होता. न्यूझीलंडचे सध्या नऊ गुण गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज विरुद्धचे सामने बाकी आहेत. त्यांना आणखी तीन सामन्यांत विजय आवश्यक असून पाकिस्तान आणि विंडीजविरुद्ध ते सहज विजय मिळवू शकतात.

४) इंग्लंड/ श्रीलंका/ बांग्लादेश
चौथ्या क्रमांकासाठी तगडी रेस असून इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन संघांना संधी आहे. परंतु या सगळ्यात यजमान इंग्लंडला सर्वात जास्त संधी असून या तीन संघांमधील इंग्लंड सर्वात मजबूत संघ आहे.

इंग्लंडचे आतापर्यंत सहा सामने झाले असून त्यांनी त्यात चार सामन्यांत विजय मिळवला असून दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंडचे आठ गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण अफ्रीका, बांग्लादेश, वेस्ट इंडीज, अफगानिस्तान यांना पराभूत केले असून पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सामने शिल्लक आहेत.

त्याचप्रामाणे श्रीलंका आणि बांगलादेश देखील गुणतालिकेत अनुक्रमाने पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असून त्यांना देखील सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. दरम्यान, सर्वच संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत असले तरी संपूर्ण साखळी सामने संपल्यानंतर आपल्याला हे चार संघ समजणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?