MS धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर ‘ही’ टूर्नामेंट खेळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मागील नऊ महिन्यापासून दूर आहे. गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेनंतर तो मैदानात दिसला नाही. इंडियन प्रीमियम लीगमध्ये (IPL) चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा धोनीचा निर्धार होता. पण कोरोना व्हायरसमुळे आलेला लॉकडाऊनमुळे आणि त्यामुळे आयपीएल स्पर्धेवर आलेल्या अनिश्चिततेच्या सावटामुळे धोनीचं पुनरागमन कठीण दिसत आहे. पण, धोनीने क्रिकेट मंडळाकडे एक विनंती केली आहे आणि ती मान्य झाल्यास धोनी मैदानावर पुन्हा खेळताना दिसणार आहे.

आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट असताना धोनीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेटी – 20 स्पेर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. धोनीने तसे झारखंड क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यावरचा निर्णय होण्याची शक्यता आहे. झारखडं क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्याने एका वेबसाईटला सांगितले की, धोनी सध्या झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय संकुलात कसून सराव करत आहे. तो राज्य संघाच्या संपर्कात आहे. धोनीने 2007 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी -20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने चार सामन्यांमध्ये 61.50 च्या सरासरीने 123 धावा केल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता. पण कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयपीएल स्पर्धा होईल की नाही यावर संभ्रम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्वेटी -20 स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याने राज्य मंडळाकडे तसा प्रस्ताव ठेवला आहे.