‘मास्टर ब्लास्टर’ सचिननं जिंकला ‘लॉरियस 20 स्पोर्टींग मुव्हमेन्ट 2000-2020’ पुरस्कार !

बर्लिन : वृत्त संस्था – क्रिकेटचा देव म्हणून ज्याची जगभरात ख्याती आहे तो भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने लॉरियस 20 स्पोर्टींग मुव्हमेन्ट 2000-2020 पुरस्कार जिंकला आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या नावाची घोषणा करण्यात आली. तेंडुलकरशी संबंधित क्षणांना कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन असे शीर्षक देण्यात आले होते.

सचिन तेंडुलकरला 2011 मधील वर्ल्ड कप विनिंग मुव्हमेन्टसाठी या अवॉर्डकरता शॉर्ट लिस्ट करण्यात आले होते. सचिनसह अनेक दावेदार 2000 से 2020 पर्यंतच्या सर्वश्रेष्ठ लॉरियस स्पार्टींग मुव्हमेन्टच्या शर्यतीत सहभागी होते.

या क्षणामुळे मिळाले सचिनला अवॉर्ड
भारतीय टीमने 2011 मध्ये विश्वकप क्रिकेटमध्ये विजय मिळवला होता. सचिन आपला सहावा विश्वकप खेळताना जिंकणार्‍या टीमचा सदस्य होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला टीम इंडियाच्या प्लेयर्सने आपल्या खांद्यावर उचलून मैदानात फिरवले होते.

लॅप ऑफ ऑनरच्या दरम्यान सचिनच्या डोळ्यात अश्रू
भारतीय टीमच्या सदस्यांनी सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानतील लॅप ऑफ ऑनर दिले होते आणि यावेळी या महान फलंदाजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. भारताने विश्वकपच्या फायनलमधील हा विजय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मिळवला होता.