… म्हणून सौरव गांगुली BCCI चा अध्यक्ष झाला, ‘या’ व्यक्तीनं केला मोठा गौप्यस्फोट

पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियांचा माजी कर्णधार सौरव गांगुली अनेक नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. सुरुवातीला माजी क्रिकेटर आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ब्रजेश पटेल बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्याच्या रेसमध्ये पुढे होते. परंतू अंतिम क्षणी सौरव गांगुलीचे नाव पुढे आले आणि त्याच्याकडे बीसीसीआयची धूरा सोपवण्यात आली. सौरव गांगुली ने सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त प्रशासकीय समितीने कामकाज आपल्या हातात घेतले होते, परंतू आता गांगुलीच्या बीसीसीआयच्या अध्यक्ष बनल्यानंतर आणि काही बाबी समोर आल्या.

समितीच्या सुधारामुळे मिळाले अध्यक्ष पद –
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आता बीसीसीआयचे लक्ष भारतीय क्रिकेटने सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त लोढा समितीच्या शिफारसी बदलण्यावर आहे. परंतू लोढा समितीचे अध्यक्ष आरएम लोढा यांनी याला दुर्भाग्यपूर्ण सांगितले आहे. त्यांनी सौरव गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्ष बनण्यात समितीची भूमिका महत्वाचे असल्याचे सांगितले. जस्टिस आर एम लोढा यांनी सांगितले की हे अत्यंत दूर्भाग्य आहे, मला वाटले की एक क्रिकेटर ही बाब समजू शकेल. त्यांची नियुक्ती देखील समितीच्या सुधारणामुळे झाली.

जस्टिस लोढा म्हणाले – कोणताही क्रिकेटर स्वप्नात देखील विचार करु शकत नाही –
आरएस लोढा म्हणाले की जर पुर्वीची प्रक्रिया असती तर कदाचित क्रिकेटर बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्याबाबात स्वप्न देखील पाहू शकला नसता. क्रिकेट प्रशासनात जे काही राजकारण होतं होते. मला वाटत नाही की कोणी क्रिकेटर या पदावर पोहचू शकला नसता. हे फक्त आम्ही केलेल्या सुधारणामुळे शक्य झाले. लोढा समितीच्या शिफारसीनुसार गांगुली बीसीसीआयमध्ये एकापेक्षा जास्त पद संभाळू शकत नाहीत. हेच कारण आहे की वादाचा मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे.

बीसीसीआय अध्यक्ष गांगुली भारतीय क्रिकेट पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नुकतेच बांग्लादेशच्या विरोधात कोलकता आयोजित झालेल्या भारतच्या पहिल्या डे नाईट कसोटीमध्ये आयोजित करण्यात महत्वाचे योगदान राहिले आहे. याशिवाय त्यांनी अंतर्गत क्रिकेटचा स्तर मजबूत करण्याची दिक्षेने काही महत्वाची पावले उचलली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयच्या एमजीएममध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. गांगुली बीसीसीआयचे 39 वे अध्यक्ष झाले आहे.

33 महिने प्रशासकिय समितीने संभाळले कामकाज –
प्रशासकीय समितीने जवळ 33 महिने बीसीसीआयचे कामकाज संभाळले होते. ज्यानंतर बीसीसीआयच्या निवडणूकीत सौरव गांगुलीला बोर्डचे अध्यक्ष निवडण्यात आले. कूलिंग आणि पीरियडची बाधा असताना सौरव गांगुलीला 9 महिने या पदावर नियुक्त करण्यात आले. परंतू बीसीसीआयच्या एजीएमध्ये कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवण्याची सहमती झाली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी मिळाल्यानंतर गांगुलीचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/