दुर्देवी ! सरावादरम्यान भीषण दुर्घटना, वीज पडून 2 क्रिकेटपट्टूंचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा जगतातील प्रत्येकासाठी धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. आकाशीय वीज दोन उदयोन्मुख क्रिकेटपटूंवर कहर बनून कोसळली आणि या अपघातात दोन्ही क्रिकेटर्सने जगाला निरोप दिला. दोन युवा क्रिकेटपटूंच्या या धक्कादायक मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा विश्व हादरले आहे. हे प्रकरण बांग्‍लादेशचे आहे, जेथे पावसाळ्यात नेहमीच विजा कोसळतात. पावसामुळे गाझीपूर स्टेडियमवर सुरू असलेले प्रशिक्षण थांबविण्यात आले होते आणि त्यावेळी क्रिकेटपटू मोहम्मद नदीम आणि मिझानपूर यांनी फुटबॉल खेळण्यास सुरवात केली, तेवढ्यातच आकाशातील वीज त्यांच्यावर कोसळली.

जवळच्या रुग्णालयात सोडला श्वास

या दुर्दैवी अपघाताचे साक्षीदार मोहम्मद पलाश यांनी सांगितले की सर्व काही अचानक झाले, आकाशातून वीज कोसळली आणि तीन मुले मैदानावर कोसळले. उर्वरित खेळाडू धावत आले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तिथे नंतर दोन जणांचा मृत्यू झाला. या 16 वर्षीय क्रिकेटपटूंचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला असल्याची पुष्टी डॉक्टरांनीही केली आहे. स्थानिक क्रिकेट प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार ते दोघेही उत्तम खेळाडू होते आणि स्पर्धेत आपले स्थान निश्चित करण्यासाठी ट्रायलसाठी तयारी करत होते.

मे 2016 मध्ये एकाच दिवसात वीज कोसळल्याने 82 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यास एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले होते. बांग्‍लादेश नॉन प्रॉफिट नेटवर्क डिझास्टर फोरमच्या म्हणण्यानुसार, यावर्षी आतापर्यंत सुमारे 350 लोक या कारणामुळे मरण पावले आहेत.