ICC World Cup 2019 : ‘या’ कारणामुळं टीम इंडियाचा पराभव, प्रशिक्षक रवी शास्त्रींचा ‘खुलासा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत भारताने उत्तम कामगिरी करत खेळण्यात आलेल्या १० पैकी ८ सामन्यात विजय मिळवला. मात्र सेमीफायनलमध्ये भारताला उत्तम कामगिरी करता न आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या या पराभवावर भाष्य केले. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा अनुभवी खेळाडू नसल्यानेच भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्याचे रवी शास्त्री यांनी कबुल केले आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले कि, या स्पर्धेत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाची उणीव भासली. मात्र आता आम्हाला याविषयी विचार करण्याची गरज आहे. लोकेश राहुल, विजय शंकर यांना चौथ्या क्रमांकासाठी संघात घेतले होते. मात्र शिखर धवन जखमी झाल्यामुळे लोकेश राहुल याला सलामीला खेळायला लागले आणि विजय शंकर याची कामगिरी उत्तम न झाल्याने याचा फटका भारतीय संघाला बसला. त्याचबरोबर भारतीय संघाच्या कामगिरीचे समर्थन करताना त्यांनी रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा यांचे कौतुक देखील केले.

दरम्यान, या स्पर्धेत एका सामन्यात, अर्ध्या तासात आम्ही वाईट खेळलो, मात्र यामुळे आमच्या एकूण कामगिरीचे महत्व कमी होते असा नाही, असे देखील त्यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर खेळाडूंना वाईट वाटणे सहाजिक आहे. परंतु खेळाडूंनी आता याचा जास्त विचार करण्याऐवजी विंडीज दौऱ्यावर लक्ष केंद्रित करावे असे देखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like