पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतुसे बाळगणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २५ हजार ३०० रुपयांचे एक गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने सोमवारी (दि.१) पौड किनारा हॉटेल वनाज कंपनी समोर पौड रोड येथे केली.

आशिष विनायक महाडीक (वय-३१ रा. वृंदावन कॉलनी, महालक्ष्मी निवास, आझादनगर, कोथरुड, पुणे)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. कोथरुड पोलिसांनी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विशाल शिर्के यांना एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असू तो वनाथ कंपनीसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पौड रस्त्यावरील वनाझ कंपनीसमोरील हॉटेल किनारा येथे सापळा रचून महाडीक याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २५ हजार रुपयांची एक गावठी बनावटीची पिस्टल आणि ३०० रुपयांचे दोन काडतुसे जप्त केली आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab857d87-c6e6-11e8-a41a-6571fba4daa0′]
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी पथकाचे कर्मचारी सुनिल पवार, अब्दुलकरीम सय्यद, सुहास कदम, विशाल शिर्के, गणेश साळुंके, सुहास कदम, शंकर संपते, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.
[amazon_link asins=’B019XSHB7O,B074RMN99F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8215586-c6e6-11e8-bf6e-9bbbd62049c9′]
निगडीत घरफोडी
पिंपरी – चिंचवड : बंद फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून चोरटयांनी घरातील सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड स्टेशन जवळ सोमवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. आशा अरुण सावदेकर (वय 59, रा. जगन्नाथ कॉम्प्लेक्स, चिंचवड स्टेशन) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा सोमवारी सकाळी कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरटयांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 36 ग्रॅम सोन्याचे दागिने, 10 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 15 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आशा दुपारी तीनच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून त्यांनी तात्काळ निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
[amazon_link asins=’B01G5I8YLC,B00FRCNR6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c0b82016-c6e6-11e8-9bd4-e32f83112505′]